
कोलकता : मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी चिंता व्यक्ती केली आहे. ‘‘मतदारयाद्यांची फेरपडताळणी संवेदनशीलतेने हाताळली गेली नाही, तर मोठ्या संख्येने गरीब आणि वंचित लोक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात,’’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. सेन यांनी अशा प्रशासकीय प्रक्रियेच्या न्याय्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘‘अशा नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध नसलेल्या कागदपत्रांची मागणी केली जाते,’’ असेही ते म्हणाले.