esakal | Amazonचा झोल! आपली उत्पादनं विकण्यासाठी इतर ब्रॅंडची कॉपी
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon

Amazonचा झोल! आपली उत्पादनं विकण्यासाठी इतर ब्रॅंडची कॉपी

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोणतीही खेरदी करण्यासाठी आज आपल्यासमोर ऑनलाईन खेरदीचा एक उत्तम पर्याय आता आपल्या समोर उपलब्ध आहे. मात्र आता ऑनलाईन खरेदीसाठी देखील वेगवेळ्या वेबसाईट तयार झाल्याने या कंपन्यांमध्ये आता स्पर्धा सुरू झाली आहे. याच स्पर्धेतून काही कंपन्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याचं समोर आलंय. अमेरिकन सीनेटर एलिझाबेथ वॉरेनने अॅमेझॉनवर गंभीर आरोप केले असून भारतातील काही व्यापाऱ्यांनी देखील कंपनीबद्दल तक्रार केल्याचं समोर आलं आहे.

अॅमेझॉनने इतर ब्रँडच्या उत्पादनांची कॉपी केली असल्याचा गंभीर आरोप केला जात असून, आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी सर्च रिझल्ट्समध्येही देखील मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचं दिसून आल्याचं रॉयटर्सच्या अहवालातून समोर आलं आहे. कंपनीने भारतातील स्वतःच्या खाजगी ब्रॅण्डला चालना देण्यासाठी नॉकऑफ तयार करणे आणि सर्च रिझल्ट्समध्ये फेरफार करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवली असल्याचं रॉयर्सच्या वृत्तांधून समोर आलं आहे. भारतातील एक लोकप्रिय शर्ट ब्रँड असलेल्या जॉन मिलरच्या उत्पादनांचा डेटा अॅमेझॉनने तपासला असल्याचे देखील यामधून समोर आले आहे.

अॅमेझॉनवर वारंवार आरोप झाले आहे की, ते आपल्या वेबसाइटवर विकत असलेली उत्पादने बंद करून इतर विक्रेत्यांच्या खर्चावर स्वतःच्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अंतर्गत डेटाचा गैरवापर करत आहेत. मात्र कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

loading image
go to top