TikTok चे 'कच्चा बदाम' Amazon वरही चालणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon

TikTok चे 'कच्चा बदाम' Amazon वरही चालणार?

Tik Tok आणि Instagram reels चे देशभर असंख्य चाहते आहेत. आता याची लोकप्रियता पाहता Amazon पण या क्षेत्रात काम करणार असल्याचे समजते. ई-कॉमर्स साईट Amazon, Tik Tok सारख्या एका प्लॅटफॉमची चाचपणी करत आहे. त्यामुळे कदाचित खरेदी करता करता व्हिडिओ पण पाहता येवू शकतील.

वॉल स्ट्रीट जरणलच्या रिपोर्ट नुसार,सांगितल जात आहे की Amazon आपल्या मेन शॉपिंग ॲप वर एक नवा इंटरफेस करू शकतात. याची चाचपणी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांन सोबत करत आहे. आताच्या घडीला देशभर छोट्या व्हिडिओचा ट्रेंड चालू आहे. त्यामुळे आता व्हिडिओ पाहता पाहता खरेदी करण्या बरोबरच कंपनीचा जास्त फायदा होऊ शकतो.

हेही वाचा: एकतर्फी प्रेम करणाऱ्या १४ वर्षांच्या मुलानं केला २४ वर्षांच्या मुलीचा खून!

आता Amazon या फीचर्सला ई-कॉमर्स ॲप त्यांच्या फायद्या साठी वापरणार आहे. त्यांना असं वाटत आहे की या मुळे कंपनीला अधिक ग्राहक जोडले जातील. कंपनीला अस वाटत आहे की, Tik Tok लवकर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले होते. लोक असे लहान व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक ॲप वापरत आहेत.

सांगितल जात आहे की हे फीचर्स लवकरच update केलं जाईल. आणि जर चाचपणीत काही अडचणी आल्या तर कंपनी हे रद्द पण करू शकते.

Web Title: Amazon Testing Tiktok Like Feed Shopping App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AmazonOnline Shopping App