काश्‍मिरात व्यापाऱ्यांचे मरण; आठवडाभरात 1 हजार कोटींचा फटका 

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

व्यापाराची स्थिती 
1000 कोटी- आठवडाभरातील नुकसान 

175 कोटी -प्रतिदिनी होणारे सरासरी नुकसान 

200 कोटी - बेकरी व्यवसायिकांचे नुकसान

श्रीनगरः जम्मू व काश्‍मीरमधील "कलम 370' रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला आहे. या आठवडाभरात व्यापाऱ्यांचे सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याने या परिस्थितीत इतक्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

काश्‍मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (केसीसीआय) सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यापाऱ्यांना प्रतिदिन सरासरी 175 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. येथील बेकरी व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याबरोबर मेंढपाळ, जनावरांची विकी करणारे दलाल, कापड विक्रेते व इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही याची झळ बसत असल्याची माहिती या सदस्याने दिली. 

व्यापाराची स्थिती 
1000 कोटी- आठवडाभरातील नुकसान 

175 कोटी -प्रतिदिनी होणारे सरासरी नुकसान 

200 कोटी - बेकरी व्यवसायिकांचे नुकसान

तणावामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ईद साजरी होणार नसल्याचे संकेत आहेत. ईदनिमित्त नवीन कपड्यांच्या खरेदीला प्राधान्य असते. मात्र, या वेळी नागरिकांची तशी मनःस्थिती नाही. - मोहंमद यासिन, कापड विक्रेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amid restrictions, traders in Srinagar suffer loss of Rs 1,000 crore in week