
नवी दिल्ली : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते तर तो देशाचा आत्मा असतो. भाषांना जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच हिंदी भाषा ही कोणत्याही भारतीय भाषेची शत्रू नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.