Amit Shah : नव्या मुखवट्यातील ‘जंगलराज’ पुन्हा नको, अमित शहा; जनतेने ‘एनडीए’ला आणखी एक संधी द्यावी
Bihar NDA : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये पुन्हा 'एनडीए' (मोदी-नितीश) सत्तेवर येणार असल्याचा दावा करत, नव्या मुखवट्यातील 'जंगलराज'ला पुन्हा संधी न देण्याचे आवाहन केले.
पाटणा : बिहारमध्ये पुन्हा ‘एनडीए’च सत्तेवर येणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. नव्या कपड्यांमधील करून अथवा नव्या मुखवट्यातील ‘जंगलराज’ बिहारमध्ये पुन्हा येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.