Amit Shah : देश २०४७ पर्यंत नशामुक्त होईल, गृहमंत्री शहा यांचा दावा; तस्करांविरोधात कारवाईस कटिबद्ध
Drug Free India : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या कठोर कारवाईची ग्वाही दिली असून, २०४७ पर्यंत भारत नशामुक्त होईल, असा दावा केला आहे.
नवी दिल्ली : ‘‘तरुणांना व्यसनाधीन बनविणाऱ्या अमलीपदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाईसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आपला देश २०४७ पर्यंत नशामुक्त होईल,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.