Amit Shah: पूरग्रस्त राज्यांना भरीव आर्थिक मदत; अमित शहा यांची सोशल मीडियावर ‘पोस्ट’
India Flood Relief: पूरग्रस्त आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, केरळ आणि उत्तराखंड राज्यांना केंद्र सरकारने १,०६७ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निधीतून सुमारे ८,००० कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशातील पूरग्रस्त राज्यांना केंद्र सरकारने एक हजार ६७ कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.