Amit Shah : "सत्यपाल मलिक यांचे म्हणणे योग्य आहे, मग ते..." अमित शहांचा पलटवार

Amit Shah
Amit Shah

Amit Shah : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक खुलासे केले होते. यावरून देशात राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्ष काँग्रेस सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे.

सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर त्यांना मिळालेल्या सीबीआय नोटीसबाबत प्रश्नांची उत्तरे देताना गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

इंडिया टुडेच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांनी सत्यपाल मलिक यांच्या पुलवामावरील वक्तव्यावर पलटवार केला. भाजपपासून फारकत घेतल्यानंतरच त्यांना ह्या सर्व गोष्टी का लक्षात आल्या, सत्तेत असताना त्यांचा आत्मा का जागृत झाला नाही? भाजपने लपवावे लागेल असे काहीही केलेले नाही, असे अमित शहा म्हणाले.

Amit Shah
Ajit Pawar: “…तोपर्यंत एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल”, ‘त्या’ विधानावरून अजित पवारांचा खोचक टोला!

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की पुलवामा दुर्घटना केंद्राच्या चुकीमुळे घडली होती. कारण केंद्र सरकारकडून सैन्याला हवाई वाहतूक करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले आहे.

Amit Shah
Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका! 400 कोटींचा करार अडकला, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com