
नवी दिल्ली : आगामी ५ फेब्रुवारी हा राजधानी दिल्लीसाठी ‘आपदा’ मुक्ती दिवस ठरणार असून झोपडपट्टीवासीय दिल्लीचे मुक्तिदाते ठरू शकतात, अशा शब्दांत विश्वास व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचारात झोपडपट्टीवासीयांना सत्ताधारी आम आदमी पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले.