ओवैसींवरील हल्ल्याबाबत अमित शहा संसदेत म्हणतात, 'त्यांना मी आधीच...'

Amit Shaha
Amit Shahaesakal
Updated on

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेनंतर आता हा हल्ला कुणी केला, असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. आता या हल्ल्यासंदर्भातील सविस्तर उत्तर संसदेमध्ये स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. (Union Home Minister Amit Shah)

Amit Shaha
PM मोदी म्हणतात, योगींच्या काळात माफिया स्वत:हून तुरुंगात गेलेत आणि आता...

संसदेत याबाबतचं निवेदन वाचून दाखवताना ते म्हणाले की, तीन अनोळखी व्यक्तींनी कारवर गोळीबार केला. ते त्यातून सुरक्षितरित्या वाचले मात्र, गाडीच्या खालच्या भागात तीन गोळ्यांच निशाण दिसून आले. तीन साक्षीदारांकडून या घटनेबाबत साक्ष नोंदवण्यात आली. याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 307 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओवैसींचा हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नियोजनबद्ध नव्हता. तसेच याबाबत कोणतीही सुचना जिल्हा निवेदन कक्षाला देण्यात आली नव्हती. या घटनेनंतर ओवैसी दिल्लीला परतले. या घटनेची दखल घेत स्थानिक पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला आणि दोन संशयित आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून दोन अनधिकृत पिस्तूल आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आली.

पुढे ते म्हणाले की, घटनास्थळ आणि जप्त वस्तूंचा फॉरेन्सिकद्वारे सूक्ष्मपणे अभ्यास करण्यात येत आहे. दोन्हीही ओरोपींची चौकशी सुरु असून पुरावे गोळा केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे राज्य सरकारकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. याआधीही ओवैसींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. मात्र, ओवैसींकडून सुरक्षा घेण्याच्या अनिच्छेमुळे दिल्ली पोलिस आणि तेलंगणा पोलिस त्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ओवैसींना असलेली धोक्याची बाब लक्षात घेता त्यांना बुलेटप्रुफ कार आणि झेड सुरक्षा प्रदान केली आहे.

Amit Shaha
अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू

पुढे त्यांनी ओवैसींना विनंती करत म्हटलंय की, ओवैसींनी तोंडी माहिती दिली आहे त्यानुसार त्यांनी सुरक्षा घ्यायला नकार दिला आहे. मी सदनाच्या माध्यमातून ओवैसींना अशी विनंती करु इच्छितो की, त्यांनी तात्काळ सुरक्षा स्विकारावी आणि आमची चिंता मिटवावी.

नेमकं काय घडलं?

हापूर-गाझियाबाद भागातील राष्ट्रीय महामार्गावर २४ वरील छिजारसी टोल प्लाझाजवळ ओवेसी यांची गाडी आली असताना सायंकाळी सहा वाजता गोळीबाराची घटना घडली. ‘‘माझ्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार करणारे तीन-चार जण होते, शस्त्रे टाकून ते सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा दुसऱ्या गाडीतून मी पुढे रवाना झालो,’’ असे ट्विट ओवेसी यांनी घटनेनंतर केले.

“निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी. यात कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारनेही याची चौकशी करावी,” अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com