esakal | "PM मोदी जागतिक व्यासपीठावर हिंदीत बोलतात तर आपल्याला कसला संकोच"
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

"PM मोदी जागतिक व्यासपीठावर हिंदीत बोलतात तर आपल्याला कसला संकोच"

sakal_logo
By
सुधीर काकडे

आज जागतिक हिंदी भाषा दिनानिमीत्त देशभरात वेगवेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राष्ट्रीय हिंदी भाषा दिनानिमीत्त आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंदी भाषेचा देशात मोठ्या प्रमाणात वापर व्हावा असे आवाहन केले. हिंदी दिनानिमीत्त सर्वांनी हिन्दी बोलण्याचा संकल्प करावा असेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलतात, तर आपण का संकोच करायचा. आता ते दिवस गेले जेव्हा हिंदी बोलणे हा चिंतेचा विषय होता. ‘तो काळ गेले जेव्हा हिंदी बोलण्यात संकोच वाटत होता, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आंतरराष्ट्रीय मंचावर हिंदीतही बोलतात.’ असे विधान अमित शहा यांनी यावेळी केले. अमित शहा यांनी असेही सांगितले की, केंद्र सरकार हिंदी आणि इतर भाषांच्या विकासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हे प्रभावी माध्यम आहे, हिंदी भाषा आपली सांस्कृतीक आणि राष्ट्रीय एकता जपणारी भाषा आहे. तसेच आत्मनिर्भर भारत बनवण्यात देखील भाषेची महत्वाची भुमिका असणार आहे, हे सांगताना आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत, आत्मनिर्भर हा शब्द केवळ उत्पादन आणि व्यावसायिक व्यवस्थांसाठी नाही, तर आपल्याला भाषेच्या बाबतीतही आत्मनिर्भर व्हावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रीय हिन्दी दिनानिमीत्त लोकांना जास्तीत जास्त हिंदी बोलण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

loading image
go to top