esakal | ममतांनी आऊटसायडर म्हटल्यानं शहा भडकले; काँग्रेससह TMCवर जोरदार हल्लाबोल

बोलून बातमी शोधा

Amit Shah in West Bengal

ममतांनी आऊटसायडर म्हटल्यानं शहा भडकले; काँग्रेससह TMCवर जोरदार हल्लाबोल

sakal_logo
By
अमित उजागरे

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ पैकी चार टप्प्यातील मतदान नुकतचं पार पडलं. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसा इथला प्राचार चांगलाच रंगात आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केलेल्या जहरी टिपण्णीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा मंगळवारी चांगलेच भडकले नागराकाटा येथील सभेत त्यांनी ममतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. शहा म्हणाले, "दीदी मला बाहेरचे (आउटसायडर) म्हणाल्या. पंतप्रधानांनाही त्या बाहेरचे म्हणाल्या. पण दीदी मी तुम्हाला सांगतो कोण बाहेरचं आहे. कम्युनिस्ट विचारधारा बाहेरची आहे कारण ती चीन आणि रशियातून आलेली आहे. काँग्रेसचं नेतृत्व बाहेरचं आहे, जे इटलीहून आलेलं आहे. तृणमूल काँग्रेसची वोट बँक बाहेरची आहे, कारण ते घुसखोर आहेत."

हेही वाचा: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपची 'पावरी', जेपी नड्डांचा व्हीडिओ व्हायरल

घुसखोरांना काँग्रेस, माकपा आणि ममता दीदींना सांभाळायचं आहे कारण हे त्यांची वोट बँक आहेत. आम्ही २ मे रोजी सरकार स्थापन केल्यानंतर माणूसच काय पक्षी देखील घुसखोरीची हिंम्मत करणार नाही. घुसखोरीच्या समस्येवर केवळ कमळाचं फूल आणि नरेंद्र मोदी हेच उपाय करु शकतात, असंही शहा यावेळी म्हणाले.

ममता दीदींनी २ मे रोजी राजीनाम्यासाठी सज्ज रहावं

अमित शहा म्हणाले, ममता दीदी माझा राजीनामा मागत आहेत. मात्र, ही बंगालच्या जनेतेची मागणी नाही. बंगालची जनता माझं मालक आहे. दोन मे रोजी बंगालची जनताच तुमच्याकडे राजीनामा मागेल. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल तो तयार ठेवा. ही निवडणूक माझ्या राजीनाम्याची नाही. दीदींना चहा आणि चहावाल्यांशी शत्रूत्व आहे. मोदींना बंगालचं कल्याण हवं आहे. तर ममता दीदी आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत. दीदींना गरीबांची काहीही चिंता नाही. केवळ नरेंद्र मोदींनाच गरीबांची चिंता आहे.