महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला.

शहा म्हणाले, की स्वराज्यासाठी संघर्ष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी त्यांचे पक्षात स्वागत करतो. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जनसंघ आणि भाजप कायम छत्रपतींच्या विचारापासून प्रेरणा घेत आले आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. छत्रपतींचे वंशज भाजपत आले, उदयनराजेंनी अवघ्या तीन महिन्यात राजीनामा दिला, त्यांचं स्वागत करतो, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचंच सरकार येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah praises CM Devendra Fadnavis