पाकव्याप्त काश्मीरवर आजही भारताचा हक्क- अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच अमित शहांनी लोकसभेत बोलताना पाकव्याप्त काश्मीवरही भारताचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच अमित शहांनी लोकसभेत बोलताना पाकव्याप्त काश्मीवरही भारताचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरु असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाली असल्याचीही टीका केली. पाकिस्तानने  कलम 370चा वापर करत काश्मीर धुमसत ठेवलं असं सांगत त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच कलम 370 अर्थव्यवस्थेला मारक असल्याचंही लवकरच सिद्ध करु असेही अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, देशहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात आणि हा कलम 370 रद्द करणे हे देशहिताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे होते तेच आम्ही करत आहोत. समाजविघातक शक्तींना देशात कधीच पुढे येऊ देणार नसल्याचेदेखिल त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, कलम 303 आजही संविधानाचा अविभाज्य घटक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah responds to debate in Lok Sabha