Amit Shah reply to Rahul Gandhi voter fraud claims : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या मदतीसाठी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या आरोपांवरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाष्य राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं.