esakal | National Press Day : 'मोदी सरकार नेहमीच प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध'
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

अमित शहा यांनी म्हटलंय की मोदी सरकार प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध आहे.

National Press Day : 'मोदी सरकार नेहमीच प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

 नवी दिल्ली : कोविड-19 च्या विरोधात जागृती करण्यासंबंधी मीडियाने अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॅशनल प्रेस डे चे औचित्य साधून मीडियाचे कौतुक केलं आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नॅशनल प्रेस डे निमित्त शुभेच्छा देताना म्हटलंय की मोदी सरकार हे नेहमीच प्रेसच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे. 

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने या निमित्ताने एक वेबिनार आयोजित केला होता. यावेळी पंतप्रधान यांनी एक लिखित संदेश पाठवला होता. त्यात त्यांनी म्हटलंय की, सकारात्मक टीका असो किंवा यशस्वीतेच्या कहाण्या असोत या सगळ्यांना सर्वदूर पोहोचण्याचे काम करत भारतातील मीडिया लोकशाहीची भावना सातत्याने मजबूत करत आहे. 
त्यांनी म्हटलंय की, महत्त्वाच्या मुद्यांवर सामुहीक जाणीव निर्माण करण्यापासून ते व्यापक हितासाठी सामाजिक परिवर्तन आणण्यापर्यंत मीडियाने एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावली आहे. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांना बळ दिलं आहे. 

हेही वाचा - देवाच्या पायावर डोके असतानाच माजी काँग्रेस आमदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

तर अमित शहा यांनी ट्विट करत म्हटलंय की, नॅशनल  प्रेस  डेच्या सदिच्छा. आपल्या देशातील मीडिया आपल्या राष्ट्राचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. मोदी सरकार प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच त्याला बाधित करणाऱ्या लोकांचा आम्ही विरोध करतो. मी कोविड-19 च्या दरम्यान मीडियाच्या अभूतपूर्व भुमिकेचे कौतुक करतो.