देवाच्या पायावर डोके असतानाच माजी काँग्रेस आमदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

vinod daga
vinod daga

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना खूपच चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील बैतूल मध्ये ही घटना घडली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या विनोद डागा यांचा अलिकडेच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू हाच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यांना देवाच्या दारात मृत्यू आला आहे. 

विनोद डागा हे निस्सिम भक्त होते. ते दररोज घराजवळच्याच जैन मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचे. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते 12 नोव्हेंबर रोजी जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी हात जोडून नमस्कार करुन देवाचे दर्शन घेतले. देवाच्या पायावर आपले डोके ठेवण्यासाठी म्हणून ते वाकले आणि त्यांनी आपले डोके मूर्तीच्या चरणावर ठेवले. मात्र, यावेळीच त्यांना हृदयविकाराचा एक जबर झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा त्याचक्षणी मृत्यू झाला. देवाच्या पाया पडत असतानाच त्यांचा असा मृत्यू झाला असल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विनोद डागा हे माजी आमदार आहेत. तसेच ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते दररोज सकाळी देवाच्या दर्शनासाठी जैन मंदिरात येतात. देवाचे दर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे, पुन्हा देवाच्या चरणावर डोके टेकून पाया पडणे असा त्यांचा नेहमीचा दिनक्रम राहिला आहे. या नित्यक्रमाप्रमाणेच त्यांनी 12 तारखेलाही देवाचे दर्शन घेतले. मात्र, त्यांचा देवाच्या चरणी डोके असतानाच मृत्यू आला.

हा प्रकार लक्षात आल्यावर मंदिरातील एका मुलीने पुजाऱ्यांना ही माहिती दिली. पुजाऱ्यांना घटनास्थळी डागा पडल्याचे दिसल्यावर त्यांनी त्यांना जवळच्या दवाखान्यात नेले मात्र त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
विनोद डागा हे मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी भोपळमध्ये होते. तिथून ते बुधवारी रात्री बैतूलला परतल्यावर गुरुवारी नित्यक्रमापणे देवाच्या मंदिरात गेले होते. विनोद डागा हे भाग्यवान असल्यानेच त्यांना असा मृत्यू आल्याचे मंदिराच्या पुजाऱ्याने म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com