Amit Shah to address Parliament on student protest and lathi charge issue
esakal
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संसदेचं कामकाजही ठप्प झालं आहे. अशातच आता या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उत्तर देण्यास तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह सभागृहात नेमके कधी बोलणार, याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.