गोपाळगंज (बिहार) : ज्यांनी पशुखाद्यातही गैरव्यवहार केला ते कधीच लोककल्याणाबाबत विचार करू शकत नाहीत, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालूप्रसाद यादव यांना लगावला. बिहारमधील गोपालगंज येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा अनेक गैरव्यवहारात समावेश असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.