esakal | विजयाची रणनीती आखण्यासाठी अमित शहा येणार गोव्यात | Amit shah
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

विजयाची रणनीती आखण्यासाठी अमित शहा येणार गोव्यात

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

पणजी: पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला (goa assembly election) सुरुवात झाली आहे. शिवसेनेने (shivsena) गोवा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असताना, आता भाजपने देखील निवडणुकांचं रणशिंग फुकलं आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) १४ आणि १५ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांसाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा (devendra fadnavis) हा दौरा असणार आहे. १३ तारखेला देवेंद्र फडणवीस गोव्यात जाणार आहेत. १३ आणि १४ तारखेला फडणवीस गोव्यात असणार आहेत.

स्वतः अमित शहा गोव्यात येऊन आढावा घेणार आहेत. एक दिवस ते गोव्यात थांबतील. देवेंद्र फडणवीस १३ तारखेला एक दिवस आधी जाऊन आढावा घेतील. 14 तारखेला दिवसभर अमित शहा यांच्या सोबत बैठका घेऊन ते नागपूरला जातील. नागपूरला १५ तारखेला संघाचा कार्यक्रम असणार आहे. 15 तारखेच्या दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी फडणवीस नागपुरात जावं लागणार आहे.

हेही वाचा: ५५ वर्षीय महिलेला फरफटत जंगलात नेलं, अन् केला सामूहिक बलात्कार

४० सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये आता भाजपाची सत्ता आहे. निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये बरीच पडझड झाली आहे. आपही यंदा गोव्यात पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेने सर्वच्या सर्व ४० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मागची विधानसभा निवडणुकही शिवसेनेने लढवली होती. पण त्याचा उपयोग झाला नव्हता.

loading image
go to top