esakal | "जमियत उलेमा ए हिंद संघटनेकडून अमित शहांना धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah won't be allowed to step out of Kolkata airport says Jamiat-Ulema-e-Hind
  • शहांना विमानतळाबाहेर पडू देणार नाही
  • संघटनेचा इशारा

"जमियत उलेमा ए हिंद संघटनेकडून अमित शहांना धमकी

sakal_logo
By
वृत्तसेवा

कोलकता : सुधारित नागरिकत्व कायदा मागे न घेताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकत्याला आल्यास त्यांना विमानतळाबाहेर पडूच देणार नाही, असा इशारा "जमियत उलेमा ए हिंद' या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्दीकउल्लाह चौधरी यांनी दिला. ते पश्‍चिम बंगाल सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नागरिकत्व कायदा हा मानवता आणि देशातील नागरिकांच्या विरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"आमचा हिंसाचारावर विश्‍वास नाही. मात्र, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला आमचा विरोध आहे. तो मागे न घेताच अमित शहा कोलकत्याला आले तर त्यांना तेथेच अडवून ठेवण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने जमा होऊ,' असे चौधरी यांनी म्हटले आहे. 

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी 

जमीयत उलेमा-ए-हिंद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी रविवारी धमकी देताना म्हटले आहे की, केंद्र सरकारने तातडीने नागरिकत्स सुधारणा कायदा मागे घ्यावा. अन्यथा जेव्हा केव्हा अमित शहा कोलकात्यात येतील तेव्हा त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू देणार नाही. वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयक हे वर्षानुवर्षे भारतात राहणाऱ्या नागरिकांच्या विरोधात आहे. या कायद्याच्या विरोधात संघटनेनं रॅली काढली होती. त्यावेळी त्यांनी गरज पडली तर, आम्ही त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू देणार नाही. आम्ही त्यांना विमानतळावर रोखण्यासाठी एक लाख लोकांना विमानतळाबाहेर जमवू शकतो, असा दावा चौधरी यांनी केलाय. त्यांच्या या रॅलीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संघटनेचे आभार मानले आहेत. 


आम्ही हिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकरणार नाही. पण, आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसीला तीव्र विरोध करत आहोत. पंतप्रधान मोदींच्या 56 इंचाच्या छातीने देशवासियांची निराशा केलीय. ते द्वेषाचे राजकारण करत आहेत.- सिद्दिकउल्ला चौधरी, प्रदेशाध्यक्ष, जमीयत उलेमा-ए-हिंद संघटना

loading image
go to top