esakal | तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi addresses mega rally at Ramlila Maidan in Delhi

मोदीला देशातील जनतेने निवडून पंतप्रधानपदी बसवले आहे. मोदीचा जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा; हवं तर माझे पुतळे जाळा. परंतु, देशाची संपत्ती जाळू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहनं जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा सवाल केला आहे. 

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : मोदीला देशातील जनतेने निवडून पंतप्रधानपदी बसवले आहे. मोदीचा जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा; हवं तर माझे पुतळे जाळा. परंतु, देशाची संपत्ती जाळू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहनं जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा सवाल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या मुद्यावरून काँग्रेस, विरोधीपक्षांसह हिंसाचार करणाऱ्यांवर आपल्या भाषणातून आज चांगलेच टीकास्त्र सोडले. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाकडून रामलीला मैदानात धन्यवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, येवळी ते बोलत होते.

धर्माला समोर ठेऊन काही करत नाही : मोदी 

पंप्रधान मोदी म्हणाले, 'हिंसाचार करणारे पोलिसांवर हे दगडफेक करत आहेत, त्यांना जखमी करत आहेत. मी त्यांना विचारतो की, पोलिसांना जखमी करुन तुम्हाला काय मिळणार आहे. सरकारे येतात जातात मात्र, पोलिस तेच असतात, ते कोणाचेही शत्रू नाहीत. स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत जवळपास ३३ हजार पोलिस बांधव शांतता व सुरक्षेसाठी शहीद झाले आहेत आणि तुम्ही याच पोलिसांना अमानुषपणे मारत आहात.'

क्रुरतेची हद्दपार ! बलात्कारानंतर तिला दिले एचआयव्हीचे इंजेक्शन

मोदी पुढे म्हणाले, 'जेव्हा एखादे संकट येते, कोणती अडचण येते तेव्हा पोलीस धर्म किंवा जात अथवा वेळ काळ न पाहता तुमच्या मदतीसाठी उभा राहतो. देशातील आजच्या परिस्थितीत सर्वात जुन्या पक्षाचे नेते केवळ कायद्यावरून उपदेश देत आहेत. शांततेसाठी दोन शब्द सांगायला कोणी तयार नाही. हिंसाचार थांबवण्यास एकहीजण सांगत नाही, याचाच अर्थ या हिंसाचारास तुमची मुकसंमती आहे असा होतो व देश हे सर्व पाहत आहे, असेही मोदींनी विरोधकांना म्हटले.