अमित शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 7 November 2020

केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांच्या पश्‍चिम बंगालमधील दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी आतापासूनच वंगभूमी पिंजून काढायला सुरवात केली आहे.

कोलकता - केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांच्या पश्‍चिम बंगालमधील दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी आतापासूनच वंगभूमी पिंजून काढायला सुरवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आदिवासी बहुल बांकुरा जिल्ह्यातून थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना वंदन करून त्यांनी प्रचाराला सुरवात केली. येथे बिरसा मुंडा यांना वंदन करताना शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शहांच्या सभेतील व्यासपीठावर बिरसा मुंडा यांचा नव्हेतर स्थानिक आदिवासी शिकाऱ्याचा पुतळा ठेवण्यात आला होता, असा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत बोलताना भारत जकात माझी परगणा महाल या संघटनेचे नेते हेम्बराम म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना येथील स्थानिक लोकांच्या परंपरांचे देखील ज्ञान नाही. हा स्थानिक आदिवासींचा अवमान आहे. भाजपचे खासदार सुभाष सरकार यांनी या चुकीबद्दल माफी मागितली आहे.

निवृत्तीवेतनात निम्म्याहून अधिक कपात; केंद्राकडून लष्कराच्या मनोधैर्याचे खच्चीकरण?

छायाचित्र पायाशी
अमित शहा यांचे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी आगमन होण्याआधी मुख्य पुतळ्याच्या पायाशी बिरसा मुंडा यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. स्थानिक शिकाऱ्याच्या पुतळ्याला मात्र याआधीच पुष्पहार घालण्यात आला होता. स्थानिक नेत्यांनी सांगितल्यानंतर शहा यांनी नंतर बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्पहार घालून वंदन केले, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah wreath laying on wrong image creates new controversy