

Bhoomipujan of 43 projects worth 8,941 crores for Yamuna river purification.
Sakal
देशाच्या राजधानीत गेल्या अनेक दशकांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आणि प्रदूषणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या यमुना नदीला कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी तब्बल ८ हजार ९४१ कोटी रुपयांच्या ४३ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे.