esakal | कोविड-19 : शहांनी घेतली सर्वपक्षीय बैठक, जाणून घ्या नेमकं काय ठरलं!
sakal

बोलून बातमी शोधा

 amit shah,  covid 19, delhi

सध्याच्या संकटजन्य परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित लढायचे आहे, असे अमित शहा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. 

कोविड-19 : शहांनी घेतली सर्वपक्षीय बैठक, जाणून घ्या नेमकं काय ठरलं!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशासह राजधानी दिल्लीत दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे. वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राजधानीतील चिघळत असलेली परिस्थिती सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व पक्षांची भूमिका आणि उपाय योजनेसंदर्भातील सूचना ऐकून घेतल्या. सध्याच्या संकटजन्य परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित लढायचे आहे, असे अमित शहा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. 

चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर

राजधानीतील कोरोनाजन्य परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी कोणती ठोस पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अमित शहा म्हणाले की, 20 जून पासून प्रत्येक दिवशी 18 हजार टेस्ट घेतल्या जातील. या बैठकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि बीएसपी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. 

36 तासांतील शहांची तिसरी बैठक 

मागील 36 तासांतील शहांची ही तिसरी बैठक आहे. यापूर्वी अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उप राज्यपाल अनिल बैजल यांच्यासह एमसीडीच्या सर्व महापौरांसोबत बैठक घेतली होती. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 41 हजारांच्या घरात पोहचला आहे. दिल्लीतील कोरोनाजन्य परिस्थितीत सत्ताधारी राज्य सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

जागतिक साथीमुळे आरोग्याचे मोठे संकट​

काँग्रेसचा आपवर आरोप 


काँग्रेसने बैठकीनंतर सत्ताधारी कोरोनाग्रस्तांचा मूळ आकडा लपवत असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला केंद्र सरकार आणि राज्यातील केजरीवाल सरकार जबाबदार आहे. आम्ही 11 सूचना दिल्या आहेत. मुख्यंत्री अरविंद केजरीवाल खासगी रुग्णालयाकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकत आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेचे काही पुरावे आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सूपूर्द केले आहेत. यासंदर्भात ते चौकशी झाल्यावर सत्य जनतेसमोर येईल, असे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.   

कोरोना वॅक्सिनसंदर्भात चिनी कंपनीने दिली गूड न्यूज!​

आपचे काँग्रेसला प्रत्युत्तर 


आकडे लपवण्याच्या काँग्रेसने केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे आपचे प्रतिनिधी संजय सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संकट हे महायुद्धापेक्षा भयावह असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. कोरोनाजन्य परिस्थितीत आवश्यक ती उपाय योजना राज्य सरकारकडून केली जात आहे. आगामी काळात बेड वाढवण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. आकडे लपवतोय असे वाटत असेल तर  ICMR कडून आकडेवारी घ्या, असेही सांगत त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.  

loading image