अमिताभ यांनी फेडले 2 हजार शेतकऱ्यांचे कर्ज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जून 2019

अमिताभ यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. अमिताभ यांनी उत्तर प्रदेशातील 1398 आणि महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलेले आहे.

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. 

अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याचे सांगितले. याशिवाय, पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी अर्थसहाय्य केले आहे.

अमिताभ यांनी लिहिले आहे, की मी दिलेले वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील 2100 कर्जबाजारी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि वन टाइम सेटलमेंट (OTS) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे.  कर्ज फेडलेल्या सर्वांना मुंबईत बोलावून श्वेता आणि अभिषेकने धनादेश दिले आहेत. 

अमिताभ यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. अमिताभ यांनी उत्तर प्रदेशातील 1398 आणि महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan pays off loans of 2,100 Bihar farmers