Air Pollution : धक्कादायक! जगातल्या सर्वांत प्रदूषित 20 शहरांपैकी भारताच्या 14 शहरांचा सामावेश

भारतामध्ये सर्वांत जास्त प्रदूषणाचे शहरे आहेत.
Pollution
PollutionSakal

Polluted Cities In India : World Of Statistics च्या अहवालानुसार जगातील सर्वांत जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या २० शहरांपैकी भारतातील तब्बल १४ शहरांचा सामावेश आहे. हा भारतासाठी धोकायदायक इशारा असून महाराष्ट्रातील भिवंडी या शहराचा यामध्ये सामावेश आहे. त्यानंतर दिल्ली या शहराचा सामावेश या यादीमध्ये होतो. पाकिस्तानातील तीन शहरांचा या यादीमध्ये सामावेश आहे.

Pollution
Video : संबळ वाजवत महिलेने दाखवली शिवकला; डोळे बांधून शोधला प्रेक्षकांमधला नारळ

दरम्यान, World Of Statistics या संस्थेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही यादी प्रसिद्ध केली आहे. हवा प्रदूषणामध्ये पहिल्या वीस शहरांमध्ये पाकिस्तानातील लाहौर या शहराचा पहिला क्रमांक लागतो तर चीनमधील होटन या शहराचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी आणि दिल्ली हे दोन शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

World Of Statistics नुसार सर्वांत जास्त हवा प्रदूषण असलेली शहरे : (PM2.5 concentration, μg/m³)

1. लाहोर, पाकिस्तान: 97.4

2. होटन, चीन: 94.3

3. भिवडी, भारत: 92.7

4. दिल्ली: 92.6

५. पेशावर: 91.8

6. दरभंगा: 90.3

7. असोपूर: 90.2

8. एन'जामेना, चाड: 89.7

9. नवी दिल्ली: 89.1

१०. पाटणा: 88.9

11. गाझियाबाद: 88.6

१२. धरुहेरा: 87.8

13. बगदाद, इराक: 86.7

14. छपरा: 85.9

15. मुझफ्फरनगर: 85.5

16. फैसलाबाद: 84.5

17. ग्रेटर नोएडा: 83.2

18. बहादूरगढ: 82.2

19. फरीदाबाद: 79.7

20. मुझफ्फरपूर: 79.2

दरम्यान, पुणे हे देशात राहण्यासाठी सर्वांत चांगले शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. पण मुंबईपासून अवघ्या १५० किमी अंतरावर असलेले भिवंडी शहर हे या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारखाने, वाहनांमधून निघणारा धूर आणि बदलत्या वातावरणामुळे हवा प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com