अमरिंदर सिंगांवर भाजपचं प्रेम; पंजाबमध्ये 'लोटस'चा नवा गेम?

शेतकरी आंदोलनामुळे भाजपचं पंजाबमधील भवितव्य धोक्यात आल्याचं दिसतं आहे.
Punjab Politics
Punjab PoliticsTeam eSakal

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली. मोठ्या गोंधळानंतर चरणजित सिंग यांची मुख्यमंत्री म्हणुन निवड करण्यात आली. मुख्यमंत्री निवडीनंतर पंजाबमधील राजकीय वादळ शांत होईल अशी शक्यता असतानाच, अमरिंदर सिंग यांच्या नाराजी नाट्यामुळे हा मुद्दा अजूनही शांत झालेला दिसत नाही. मुख्यमंत्री पद सोडावे लागलेल्या अमरिंदर सिंग यांनी पंजाब काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सिद्धूंच्या विरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळते आहे. याच संधीचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष आता अमरिंदर सिंग यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. भाजपने आता अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याला राजकीय हत्या संबोधून, एका राष्ट्रवादी नेत्याला बाजूला सारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याता आरोप करत एका नवीन ऑपरेशनला सुरुवात केल्याचे दिसते आहे.

कधी काळी अमरिंदर सिंग यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अमरिंदर सिंग यांच्याबद्दल निर्माण झालेलं प्रेम पाहता, येणाऱ्या काळात भाजप पंजाबमध्ये नवे राजकीय समीकरणं तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबच्या बहूसंख्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपचं पंजाबमधील भवितव्य धोक्यात आलं आहे.

Punjab Politics
नये है वह! राहुल - प्रियांका गांधींसंदर्भात काँग्रेस नेत्याचे मोठं वक्तव्य

अमरिंदर सिंग यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली असून, पाकीस्तानचे पंतप्रधान इम्राण खान आणि सिद्धू यांच्यातील संबंधांवर वारंवार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून, अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंच्या मुख्यमंत्री होण्याला कडाडून विरोध केला. अमरिंदर सिंग यांनी सिद्धू हे पंजाबसाठी धोकादायक असल्याचे म्हटल्याने त्यांच्या या राष्ट्रवादी भावनेचा भाजपला पुरेपूर वापर होऊ शकतो.

आता, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्यापासून पंजाब भाजपचे प्रमुख अश्वनी शर्मा, उत्तराखंडचे पक्षाचे खासदार अनिल बलुनी या सर्वांनी अमरिंदर यांच्या सुरात सुर मिळवत काँग्रेस हायकमांडला सिद्धूंच्या पाकिस्तान प्रेमाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

Punjab Politics
योगी vs प्रियांका: उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

भाजपच्या या राजकीय खेळीचा विचार करत असतानाच अमरिंदर सिंग यांची भुमिका देखील तेवढीच महत्वाची ठरणार आहे. योगायोगाने 18 सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये अमरिंदर यांनी भाजपविरोधात बोलणे टाळल्याचे दिसून आले. ही सर्व परिस्थिती येणाऱ्या काळात अमरिंदर सिंग भाजमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

गुरुवारी अनिल विज यांनी अमरिंदर यांना ‘राष्ट्रवादी’ म्हणत काँग्रेसवर पंजाब आणि पाकिस्तानला जवळ आणण्यासाठी ‘देशविरोधी षड्यंत्र’ रचल्याचा आरोप केला. "सिद्धू, पाकिस्तान समर्थक आणि इम्रान खान आणि कमर जावेद बाजवा यांचे मित्र आहेत. पंजाब आणि पाकिस्तानला जवळ आणण्यासाठी सिद्धू यांना सत्तेवर आणण्याचे काँग्रेसचे देशविरोधी षडयंत्र आहे." असा आरोप विज यांनी यावेळी केला. ते पुढे असेही म्हणाले की, कॉंग्रेसच्या गेम प्लॅनमध्ये राष्ट्रवादी विचाराचे अमरिंदर सिंग हे अडथळा होते, म्हणूनच त्यांची राजकीय हत्या करण्यात आली.

Punjab Politics
बैठकीत काय घडलं? ज्यामुळे सिद्धू ऐवजी चन्नी झाले मुख्यमंत्री

अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्या वादावर बोलताना विज यांनी एका जुन्या घटनेचा उल्लेख केला. सिद्धू इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला गेले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना विरोध करत काँग्रेसला सल्ला दिला होता. “पाकिस्तानमध्ये जाऊन सिद्धूने केवळ इम्रान खान यांची प्रशंसा केली नाही, तर देशाच्या लष्करप्रमुखांनाही आलिंगन दिले होते. जेव्हा सिद्धू परत आल्यावर अमरिंदर यांनी त्यांना पाकिस्तान दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा माझा कर्णधार अमरिंदर सिंग नाही तर राहूल गांधी आहे असे उत्तर सिद्धूंनी दिल्याचे विज यांनी सांगितले.

एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता, भारतीय जनता पक्षाने अमरिंदर सिंग यांना जवळ करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु केले असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये धोक्यात आलेले भाजपचे भविष्य बदलेल का, हे आता अमरिंदर सिंग यांच्या भुमिकेवरुनच ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com