esakal | योगी vs प्रियांका: उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

योगी vs प्रियांका: उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

काँग्रेसने राज्यात निवडणुकीची रणनिती काय असेल याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध प्रियांका अशी लढत बघायला मिळणार आहे.

योगी vs प्रियांका: उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी असलेल्या भाजपसह सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आलीय. काँग्रेसने राज्यात निवडणुकीची रणनिती काय असेल याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध प्रियांका अशी लढत बघायला मिळणार आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. तसंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा प्रियांका गांधीच करतील अशी शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल अशा प्रश्ना विचारला असता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका या प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढणार आहे. काँग्रेसच्या विजयासाठी त्या मैदानात उतरल्या आहेत आणि त्याच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करतील असं म्हटलं आहे.

सलमान खुर्शीद यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, काँग्रेसने अजुनही उत्तर प्रदेशात कोणता असा एक चेहरा निश्चित केलेला नाही. मात्र हे स्पष्ट आहे की, पक्ष ४०३ जागांवर निवडणूक लढणार आहे. काँग्रेस उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणाशी हातमिळवणी करणार नाही. पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक भागात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

हेही वाचा: दिलासादायक! देशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट, कोरोनामुक्त वाढले

पक्षाचा जाहीरनामा कसा असेल याबाबत बोलताना खुर्शीद म्हणाले की, कोणत्या तज्ज्ञाच्या मदतीने जाहीरनामा तयार करणार नाही. स्थानिक लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवणार कशा यावर आमचा जाहीरनामा असेल. पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतील असेही ते म्हणाले.

loading image
go to top