अमृता फडणवीसांचेही मोदींच्या पावलावर पाऊल

Amrita Fadnavis will also be leaving social media
Amrita Fadnavis will also be leaving social media

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सोशल मिडिया सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सोशल मिडियातून बाहेर पडणार असल्याचे ट्वीट केल्यानंतर अमृता फडणवीस यांनीही हा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांचे ट्विट रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी काही वेळा छोटे निर्णयही पुढचे मार्ग बदलतात. मी सुद्धा आमच्या नेत्यांचे अनुकरण करत असल्याचे म्हणत सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

सावधान ! आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमच्यासाठी आहे धोका

लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला होता. त्याच्य जोरावर भाजपने देशात सत्ता काबीज केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावरून भाजपने जोरदार प्रचार केला होता. केवळ निवडणुकाच नाही तर इतर वेळीही भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे.

आपण रविवारपासून फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबवरच्या सगळ्या खात्यांतून बाहेर पडण्याचा विचार करतो आहोत, याबद्दल मी लवकरच आपल्याला कळवेन असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. आजवर विरोधकांनी मोदी यांच्यावर त्यांच्या प्रसिद्धीबाबत टिका केली. प्रामुख्याने सोशल मिडियावर नरेंद्र मोदींच्या नावाने अकाऊंट होती. पण आता खुद्द मोदींनीच आपण यातून सगळ्यातून बाहेर पडत असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला उत्तर देताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान तुम्ही सोशल मीडिया सोडू नका पण द्वेष सोडा, असा सल्ला देणारे ट्विट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com