esakal | मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधीचा टोला

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhis Response After PM Modi Says He May Quit Social Media

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. ०२) सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याची घोषणा केली. यावर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला असून नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी टोला लगावला आहे.

मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधीचा टोला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. ०२) सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याची घोषणा केली. यावर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला असून नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी टोला लगावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

मोदींनी रविवारी सोशल मीडियाचा वापर बंद करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल यांनी असे ट्विट केले आहे. तत्पूर्वी, मोदींचा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या साऱ्या प्लॅटफार्मवरून एक्झिट घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यावर मोदीजी, द्वेष सोडा सोशल मीडिया नको, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

मोदींच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ; सोशल मीडिया सोडण्याचा विचार

नरेंद्र मोदी यांचे सोशल मिडियात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. एकट्या ट्विटवरवर त्यांचे साडेपाच कोटी लोक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे सोशल मिडियात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चौदा मिनिटांत तीन हजारांहून अधिक प्रतिक्रिया पडल्या आहेत. त्यांनी सोशल मिडियाचा त्याग करू नये, अशी विनवणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. अचानक निर्णय घेणे हा मोदी यांचा गुणधर्म आहे. नोटाबंदी असो की सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या निर्णयांचे धक्के नेहमीच बसतात.