सयामी जुळ्यांनी करुन दाखवलं; सोहना-मोहनाला मिळाली सरकारी नोकरी

सयामी जुळ्यांनी करुन दाखवलं; सोहना-मोहनाला मिळाली सरकारी नोकरी

अमृतसर: अमृतसरमधील सयामी जुळे असणाऱ्या सोहना-मोहना (Sohna-Mohna) यांच्या नावावर आता आणखी एक यश जमा झालं आहे. आत्मनिर्भर बनायची इच्छा बाळगून असणाऱ्या 19 वर्षीय सयामी जुळ्यांना पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Punjab State Power Corporation Limited - PSPCL)) नोकरी प्राप्त झाली आहे. नैसर्गिकरित्या नेहमीच सोबत राहणाऱ्या सोहना-मोहना यांनी पिंगलवाडामधून आयटीआयचा इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा केला आहे. राज्य सरकारने सोहना-मोहनाला ख्रिसमसच्या आधीच मस्त गिफ्ट दिलं आहे. गेल्या 20 तारखेला दोघेही 66-केव्ही पीएसपीसीएल कार्यालयामध्ये टी मेट (आरटीएम) (Regular T Mate -RTM)म्हणून नियुक्त झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पुरवठा नियंत्रण कक्षात काम करतील.

सयामी जुळ्यांनी करुन दाखवलं; सोहना-मोहनाला मिळाली सरकारी नोकरी
राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'

सयामी जुळ्यांना मिळेल इतकं वेतन

सोहना-मोहनाला सुरुवातीला 20 हजार रुपये मासिक वेतन मिळेल. पीएसपीसीएलचे सीएमडी वेणू प्रसाद यांनी म्हटलंय की, जेंव्हा आम्हाला कळलं की, या दुर्मिळातील दुर्मिळ अशा दिव्यांगांनी आयटीआयमध्ये डिप्लोमा करुन इलेक्ट्रिशीयन म्हणून आपलं करिअर करु इच्छित आहेत, तेंव्हा आम्ही त्यांना संपर्क केला. या सयामी जुळ्यांना असलेलं टेक्निकल ज्ञान उत्तम आहे. म्हणूनच, सहानुभूती दाखवत दिव्यांग कोट्यातून आमच्या विभागामध्ये त्यांना भरती करायचा निर्णय घेतला.

सोहना-मोहना यांनी म्हटलंय की, त्यांना ही संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ते पंजाब सरकारचे आभारी आहेत. सोहनाने म्हटलंय की, आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पण देऊन कष्ट करु. तर मोहनाने म्हटलंय की, आम्ही पिंगलवाडा संस्थानाचे खूप आभारी आहोत, ज्यांनी आम्हाला पुढे जाण्याची संधी दिली, आम्हाला शिकवलं आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत केली. ऑल इंडिया पिंगलवाडा चॅरिटेबल सोसायटीचे चेअरमन इंद्रजीत कौर यांनी म्हटलंय की, सोहना-मोहनाचं सरकारी सेवेमध्ये येणं अभिमानाची बाब आहे.

सयामी जुळ्यांनी करुन दाखवलं; सोहना-मोहनाला मिळाली सरकारी नोकरी
होय! गाय आमच्यासाठी माता; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना जोरदार सुनावलं

लहानपणीच माता-पिता गेले सोडून

या सयामी जुळ्यांचे दोन्ही हृदय, दोन जोडी हात आणि मणका वेगवेगळा आहे. मात्र, यकृत, पित्ताशय आणि पायांची जोडी एकच आहे. 14 जून 2003 रोजी नवी दिल्लीतील सुचेता कृपलानी हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलं. त्यानंतर त्यांना एम्समध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. यानंतर त्यांना वेगळं न करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण यामुळे एकाचा जीव जाऊ शकत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com