Amritsar Crime
Amritsar CrimeSakal

अमृतसर : सुवर्णमंदिरातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू

धार्मिक सेवेत व्यत्यय आणण्याच्या आरोपावरुन तरुणाला बेदम मारहाण करुन ठार करण्याची घटना घडली आहे.

अमृतसर : सुवर्णमंदिरातील 'रेहरास साहिब' पठणाच्या वेळी एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन 'रुमाला साहिब' वर पाय ठेवून शेजारील तलवार उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथील संतप्त भाविकांनी आणि सेवादारांनी त्या तरुणाला बेदम मारहाण (Mob Lynching) करून ठार (Death) केल्याची घटना शनिवारी अमृतसरमध्ये (Amritsar) घडली.

साधारण २० ते २५ वयाच्या या युवकाने पिवळा फेटा घातला होता. सुवर्णमंदिरात पुजा सुरु असताना तो शांतपणे उभा होता आणि त्याने अचानक उडी मारुन तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ताबडतोब त्याला बाहेर आणण्यात आले आणि वाटेत मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह शवागृहात पाठवण्यात आला असून रविवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृताच्या मृतदेहावर कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. तो एकटाच होता की त्याच्यासोबत इतर लोकं होते हे तपासण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असल्याचे उपायुक्त परमिंदर सिंग भंडल यांनी सांगितले.

Amritsar Crime
Pakistan: कराचीत नाल्यामध्ये स्फोट! 12 जण ठार तर 12 जखमी

'रेहरास साहिब' पठणाच्या वेळी तरुणानी रेलिंगवरून उडी मारुन श्री गुरु ग्रंथ साहिबच्या 'सरूप'ला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करुन शेजारी ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या उचलण्याचाही प्रयत्न केला. पण, त्याला लगेच पकडून 50 क्रमांकाच्या खोलीत नेले आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी फतेह सिंग यांनी सांगितले. तसेच त्याला थांबवत असताना त्याचे दोन बोट तुटल्याचा दावाही आणखी एका प्रत्यक्षदर्शीने केला.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, हे "सर्वात दुर्दैवी आणि घृणास्पद कृत्य" असून या प्रकरणाचा खरा हेतू उघड करण्यासाठी तपास केला जाईल.तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com