
पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड हल्ले सुरु केले आहेत. जम्मू सह अनेक शहरांवर पाकिस्ताने केलेल्या ड्रोन द्वारे केलेल्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबमधील अमृतसर शहरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, पण पाकड्यांचा हा हल्ला भारतीय लष्कराने हाणून पाडला.