
पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्यानं किमान १४ जणांचा मृत्यू झालाय. तर दारू प्यायल्यानंतर विषबाधा होऊन अनेक जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार केले जात आहेत. या प्रकरणी अमृतसर पोलिसांनी मजिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री दारू खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर दारू प्यायलेल्या काही जणांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला होता.