
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात एका व्यक्तीने अचानक अनेक लोकांवर लोखंडी पाईपने हल्ला केला. या घटनेत ५ जण जखमी झाले. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर संकुलात एका व्यक्तीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याने पाच जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.