प्रणय हत्याकांड: वडिलांच्या मृत्युबाबत अमृता म्हणाली...

वृत्तसंस्था
Monday, 9 March 2020

तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये हत्याकांडाची घटना घडली होती. मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यासमोर हत्या केल्यानंतर आता मुलीच्या वडिलांनीसुद्धा आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

हैदराबाद: तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये हत्याकांडाची घटना घडली होती. मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यासमोर हत्या केल्यानंतर आता मुलीच्या वडिलांनीसुद्धा आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तेलंगणातील ऑनर किलिंग प्रकरणामुळे देश हादरला होता. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी. मारुती राव यांनी पेरुमला प्रणय याची हत्या करण्यासाठी एक कोटींची सुपारी दिली होती. त्यानंतर, मारेकऱ्याने भर रस्त्यात अमृतासमोरच प्रणयवर वार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

प्रेयसीने ते पाहिले अन् म्हणाली आपलं लग्न झालेच नाही...

प्रणयच्या मृत्यूवेळी अमृती पाच महिन्यांची गरोदर होती. अमृताने एका मुलाला जन्म दिला असून, ती सासरी राहात आहे. मुलाला पाहून प्रणयचीच आठवण येते आणि डोळे पाणवले जातात. आपल्या पोटी प्रणयच आला असल्याचे अमृताचे मत आहे.  वडिलांच्या मृत्यनंतर बोलताना अमृता म्हणाली, 'आम्हाला वडिलांच्या मृत्यूबद्दल कुणीही माहिती दिली. टीव्हीवरील बातम्यांमधून आम्हाला याबाबत समजले आहे. वडिलांना प्रणयच्या हत्येचा पश्चाताप झाला असेल, म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी.' अमृताचे वडील मारुतीराव ऑनर किलिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पण, ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

पोलिस अधिकारी मला सारखाच म्हणतोय ये हॉटेलवर...

दरम्यान, हैदराबादपासून 80 किलोमीटरवरील एका भव्य राजवाड्यात अमृता आणि प्रणय यांनी प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केला होता. संबंधित व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

नवरदेव मंगळसूत्र घालणार तेवढ्यात नवरी म्हणाली थांब...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta says suicide goat betrothed about khairatabad murder case