अमूल, मदर डेअरीचं दूध २ रुपयांनी महागलं; 'या' तारखेपासून होणार दरवाढ

नागरिकांना महागाईची आणखी नवी झळ सोसवी लागणार आहे.
katraj milk prices will hike from Thursday
katraj milk prices will hike from Thursday

नवी दिल्ली : देशातील दोन अग्रगण्य दूधाचे बँड असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीनं दुधाच्या किंमतीत २ रुपये प्रतिलिटरने वाढ केली आहे. ही दरवाढ १७ ऑगस्टपासून होईल, असं या कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. या दरवाढीमुळं ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे. (Amul Milk and Mother Dairy hike milk prices by Rs 2 per litre with effect from 17 August)

गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशन अर्थात अमूल डेअरीनं दुधाच्या दरवाढीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्किटिंगविभागाकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि इतर ठिकाणी अमूलच्या दुधात १७ ऑगस्टपासून अर्थात येत्या बुधवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

दरम्यान, दुसरीकडं मदर डेअरीनं देखील दुधाच्या दरात वाढ केली आहे. पीटीआयनं याबाबत माहिती देताना सांगितलं की, मदर डेअरीनं दुधाच्या दरात २ रुपये प्रतिलिटरने वाढ केली असून बुधवारपासून ही दरवाढ लागू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com