महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांना झटका; दुधाच्या दरात वाढ | Amul Milk Price Hike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Milk price increases

Milk : महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांना झटका; दुधाच्या दरात वाढ

महागाईच्या काळात सर्व सामान्यांना आता आणखी एक फटका बसणार आहे. अमुलचे दुध आता महागणार आहे. अमुलमध्ये दुधाची किंमतीमध्ये दोन रुपयांमध्ये प्रति लीटर वाढ झाली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठांमध्ये अमुल गोल्डसाठी अर्धा लिटरसाठी ग्राहकांना ३० रुपये मोजावे लागतील. तसेच अमुल ताजा अर्धा लीटरसाठी २४ रुपये आणि अमुल शक्ती अर्धा लीटरसाठी २७ रुपये मोजावे लागतील. १ मार्चपासून या किंमती लागू होणार आहे. (Amul Milk Price Hike Rs 2 Per Litre From 1st March)

हेही वाचा: झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी

Amul Milk Price Hike: गुजरात कॉपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेनशने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी जुलै २०२१मध्ये दूधाच्या किंमती वाढविल्या होत्या. साधारण ७ महिने २७ दिवसांनी ही दरवाढ झाली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, उत्पादनाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य झाल्याचं जाहीर

अमुलच्या सर्व ब्रँडवर ही भाव वाढ लागू होणार आहे. यामध्ये टी स्पेशल, सोना, ताजा, शक्ती शिवाय गायी आमि म्हैशींच्या दुधाच्या किंमती देखील वाढविल्या आहे. साधारण ७ महिने आणि २७ दिवसांनी ही दरवाढ झाली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्याने दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

अमुलने या वाढीबाबत सांगितले की, रु. 2 ही केवळ 4 टक्क्यांची वाढ आहे, जी अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच कमी आहे. कंपनीने सांगितले की २ वर्षामध्ये अमुलने आपल्या ताज्या दूधाच्या श्रेणींच्या किंमती प्रति वर्ष ४ टक्के दरवाढ केली आहे. एनर्जी, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट आणि जनावरांच्या चाऱ्याच्या सरासरी महागाईमुळे दुध उत्पादनाचा खर्चामध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण खर्च वाढला आहे कंपनची म्हणणे आहे की, अमूल दूधाच्या खरेदी वर पैसे दिलेल्या प्रत्येक रुपयांमध्ये जवळजवळ 80 पैसे शेतकऱ्यांना परत दिले जातात.

Web Title: Amul Milk Price Hike Rs 2 Per Litre From 1st March

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cows Milk
go to top