झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin

झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच असून, रशियाच्या हल्ल्याला युक्रेनच्या सैनिक मोठ्या हिमतीने तोंड देत आहेत त्यामुळे आपल्या सैन्यबळाच्या जोरावर अवघ्या काही दिवसांत युक्रेनवर पूर्ण ताबा मिळवण्याचा विचार करणाऱ्या रशियाच्या स्वप्नांवर विरझण पडले आहे. या सर्व घडामोडींमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांनी एक मोठे विधान केले असून, आपल्या हत्येसाठी रशियाने 400 भाडोत्री मारेकऱ्यांना युक्रेनची राजधानी किवमध्ये तैनात केले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने या वृत्ताबाबत दावा केला आहे. (Russia Ukraine War Latest News In Marathi)

हेही वाचा: युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनमध्ये आता नवे संकट; WHO ने व्यक्त केली चिंता

झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने आमच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याला आम्ही सर्वजण खंबीरपणे लढा देत आहोत. दरम्यान, रशियाने आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला असून, यासाठी युक्रेनची राजधानी कीवमध्ये 400 भाडोत्री सैनिक तैनात करण्यात आले आहेत, या सर्वांना झेलेन्स्की यांच्या हत्येचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या सैनिकांना झेलेन्स्कींच्या सरकारला अस्थिर करण्याचेही काम देण्यात आले असल्याचे सांगितले जात असून, रशियन विमानांसाठी युरोपचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्याचा रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

हेही वाचा: सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश

युक्रेनमध्ये आतापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये ३७६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९४ सैनिकांचा समावेश असल्याचं यूएन मानवाधिकार कार्यलयाने सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे. तर सुमारे 5,300 रशियन सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत, असा दावा भारतातील युक्रेनचे दुतावास डॉ. इगोर पोलिखा यांनी केला आहे.

Web Title: Russia Sent 400 Assassins To Kill Ukraine President Zelensky

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top