

Amur Falcon
sakal
इंफाळ : दरवर्षी निश्चित कालावधीमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या अचंबित करणाऱ्या प्रवासाचे एक नवे पान उलगडले आहे. पक्षितज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात, हिवाळ्यात मणिपूर-नागालँडमध्ये येणाऱ्या अमूर ससाणा पक्ष्यांनी पाच दिवसांमध्ये दररोज सरासरी एक हजार किलोमीटर आणि अरबी समुद्रावरून अखंडित झेप ५४०० किलोमीटरचा टप्पा पार करत आफ्रिकेतील सोमालिया गाठत मुक्काम केला आहे.