गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने आठवर्षीय मुलाला लटकावले पंख्याला! | Desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने आठवर्षीय मुलाला लटकावले पंख्याला!
गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने आठवर्षीय मुलाला लटकावले पंख्याला!

गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने मुलाला लटकावले पंख्याला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजस्थानच्या (Rajasthan) बुंदी जिल्ह्यातील ही घटना... शाळेचा गृहपाठ न केल्यामुळे एका पित्याने आपल्या मुलाला पंख्याला उलटे लटकावले. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी बुंदी जिल्ह्यातील दाबी येथे घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरोपी एका आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार करताना दिसत आहे. घटनेनंतर मूल आणि त्याची आई चित्तौडगडच्या जोगनियामाता भागात गेले आणि त्यांनी आपल्या मामाला व्हिडिओ दाखवला. यानंतर महिलेच्या भावाने चाइल्ड लाइनला फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.

हेही वाचा: WhatsApp यूजर्स सावधान! 'या' मिळत्याजुळत्या अ‍ॅपमुळे होईल मोठे नुकसान

आरोपीने आपल्या मुलाचे हातपाय बांधून पंख्याला उलटे लटकावले. त्या व्यक्तीने मुलाला काठीने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला, पण पत्नीने त्याला अडवले. व्हिडिओमध्ये ते मूल रडताना आणि पंख्याला न लटकवण्याची विनंती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आई मुलाला लटकवण्यासाठी मदत करताना दिसली असली तरी आरोपीची क्रूरता टिपण्यासाठी आईनेच व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार, महिलेने फोन खिडकीजवळ ठेवला होता आणि पतीला मदत करण्याचे नाटक केले होते. मुलाच्या मामाने सांगितले की, आरोपी त्यांचा मुलगा आणि पाच वर्षांच्या मुलीला वारंवार मारहाण करत असे. या घटनेबाबत अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आरोपीच्या हिंसक स्वभावामुळे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यास घाबरत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: लॉंच होण्याआधीच Tesla Cybertruck हिट! 13 लाख युनिट्‌स बुक

मात्र, या प्रकरणाची दखल घेत राज्य बाल संरक्षण आयोगाने बुंदीच्या एसपींना कारवाई करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

loading image
go to top