लॉंच होण्याआधीच Tesla Cybertruck हिट! 13 लाख युनिट्‌स बुक; 950 Km रेंज | Sci-Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tesla Cybertruck
लॉंच होण्याआधीच Tesla Cybertruck हिट! 13 लाख युनिट्‌स बुक; 950 Km रेंज

लॉंच होण्याआधीच Tesla Cybertruck हिट! 13 लाख युनिट्‌स बुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Tesla Cybertruck लॉंच होण्यासाठी अजून बराच अवधी बाकी आहे, पण ग्राहकांमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, Tesla Cybertruck च्या आतापर्यंत 13 लाख युनिट्‌स बुक करण्यात आल्या आहेत, ज्याची एकूण किंमत सुमारे $ 80 अब्ज (सुमारे 59,554 कोटी रुपये) आहे.

हेही वाचा: WhatsApp यूजर्स सावधान! 'या' मिळत्याजुळत्या अ‍ॅपमुळे होईल मोठे नुकसान

Tesla Cybertruck पहिल्यांदा नोव्हेंबर 2019 मध्ये सादर करण्यात आला होता. हे बॅटरीवर चालणारे वाहन आहे ज्यामध्ये पिकअप करण्याची क्षमता आणि स्पोर्टस्‌ कारची कार्यक्षमता आहे. कंपनीने तिची बुकिंग रक्कम $ 1000 निश्‍चित केली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, पहिल्याच आठवड्यात अडीच लाखांहून अधिक युनिट्‌सचे बुकिंग झाले. हा आकडा सातत्याने वाढत आहे, त्यामुळे कर डिलिव्हरीला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

ही आहे Tesla Cybertruck ची खासियत...

टेस्ला सायबर ट्रकमध्ये जाड स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी दावा केला आहे की, टेस्ला सायबर ट्रकची बॉडी हतोडे आणि काही प्रकारच्या लहान शस्त्रांना तोंड देण्यास सक्षम आहे. Tesla Cybertruck ची लांबी 231.7 इंच, रुंदी 79.8 इंच आणि उंची 75 इंच आहे, ज्यामध्ये सहा लोक बसू शकतात.

हेही वाचा: मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणास ठरताहेत धोकादायक

जाणून घ्या Tesla Cybertruck ची कार्यक्षमता

कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा इलेक्‍ट्रिक ट्रक 6300 किलोपर्यंत वजन खेचू शकतो आणि 3 सेकंदात 100 Kmph वेग पकडू शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार, यात 950 किलोमीटरपर्यंत रेंज मिळेल. ट्रकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे $ 70,000 (सुमारे 52 लाख रुपये) असेल. टेस्ला सीईओने संकेत दिले आहेत, की सायबरट्रकचे उत्पादन 2022 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.

loading image
go to top