नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणातील आरोपी आनंद गिरीला ऑस्ट्रेलियात झाली होती अटक

ऑस्ट्रेलियन न्यायालयाने आनंद गिरींचा पासपोर्टही केला होता जप्त.
Anand Giri
Anand GiriTeam eSakal

उत्तर प्रदेशच्या आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातील आत्महत्या म्हटल्या गेलेल्या त्यांच्या मृत्यूवर त्यानंतर मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांचा मृत्यू झाला नसून, हत्या झाली असल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य काही जणांकडून केला गेला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी आनंद गिरी याला पोलिसांनी अटक केली आहे. आनंद गिरी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या वेगवेळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

आनंद गिरी हे सध्या अटकेत असून पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाता आहेत. आनंद गिरी यांच्यावर यापुर्वी देखील असे गंभीर आरोप झाले आहेत. आनंद गिरी हा महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य होता. आखाडा परिषदेत आल्यावर आनंद गिरी यांनी आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. त्यानंतर परदेशात जाऊन धर्माचा प्रचार करण्यासाठी ते इंग्रजी भाषा देखील शिकले.

धर्म प्रचारासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या आनंद गिरी यांच्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २०१९ कारवाई देखील करण्यात आली होती. २०१६ साली आणि २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेत दोषी आनंद गिरी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील एका शहरातील रुटी हिल येथे प्रार्थना सभेत उपस्थित असताना एका 29 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता.

तर नोव्हेंबर २०१८ साली घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत सिडनीमध्ये एका कार्यक्रमात ३४ वर्षीय महिलेचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. मे 2019 मध्ये, जेव्हा आनंद गिरी ऑस्ट्रेलियाच्या सहा आठवड्यांच्या आध्यात्मिक कार्यक्रामानिमीत्त दौऱ्यावर होते, तेव्हा या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली होती. भारतात येण्यासाठी विमानात बसण्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

न्यायालयाने तत्कालीन आनंद गिरी यांचा जामीन नाकारत त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. तसेच काही दिवसांनी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांना दररोज संबंधित पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे हिंदू स्वामी म्हणून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहायचे नाही असेही सांगितले.

ऑस्ट्रेलियन न्यायालयाने आनंद गिरीचा पासपोर्ट जप्त करत त्यांना दुसऱ्या पासपोर्टसाठी अर्ज करण्यास मनाई केली होती. तसेच त्यांच्या हालचालींवरही निर्बंध घातले होते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एक किलोमीटरच्या आत किंवा ऑस्ट्रेलियातून बाहेर पडला येईल अशा कोणत्याही ठिकाणी जाऊ नये असे आदेश दिले होते. त्यावेळी आनंद गिरी यांनी पाठीवर थाप देऊन आशीर्वाद देण्याची हिंदु धर्मात पद्धत असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com