कोरोनासंबंधी आनंद महिंद्रांचं नेटकऱ्यांना भन्नाट चॅलेंज!

एक जुना फोटो शेअर करुन त्यांनी नेटकऱ्यांना प्रश्न विचारला आहे.
Satelite sputnik
Satelite sputnikPhoto by Aanand Mahindra

नवी दिल्ली : जगाच्या इतिहासात असे अनेक क्षण आहेत जे खरोखरचं आयकॉनिक आहेत. हे क्षण ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवले आहेत त्यांनाच नव्हे तर त्यानंतरच्या अनेक पिढ्यांसाठीही ते कायम लक्षात राहणारे असतात. अशाच एका क्षणाचे काही फोटो प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) यांनी सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. जे सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (viral) झाले आहेत. या फोटो ओळखण्याचं महिंद्रांनी नेटकऱ्यांना चॅलेंजही (cahallenge) दिलं आहे. जे अनेकांनी स्विकारलं आणि ओळखलंही. (Anand Mahindra challenges netizens on the backdrop of corona)

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एका जुन्या वस्तूचा फोटो शेअर केला आणि म्हटलं की, हे एक अस छायाचित्र आहे जे सर्वांना परिचित आहे. पण हे कशाचं छायाचित्र आहे हे नेटकऱ्यांनी ओळखावं. महिंद्रा यांनी चॅलेंज देताना विचारलं की, "हे काय आहे? हे छायाचित्र कोणी ओळखू शकेल का? ज्याचं नाव सध्या सर्वांसाठी ओळखीचं बनलं आहे. अशा शब्दांत महिंद्रा यांनी आपल्या प्रश्नामध्येच उत्तराची हिंटही दिली आहे.

Satelite sputnik
अमेरिकेत लस घेतलेले झाले मास्क फ्री, पण भारतात का नाही?

पण अनेक नेटिझन्सनी महिंद्रा यांचं हे चॅलेंज स्विकारलं आणि यावर उत्तरंही दिली आहेत. नेटिझन्सनी म्हटलं की, "हा जगातील पहिल्या मानवनिर्मित स्पुटनिक उपग्रहाचा फोटो आहे. जो एका बॉलप्रमाणे दिसतं असून त्याला चार अँटेना आहेत. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी हा उपग्रह आकाशात सोडण्यात आला होता. या उपग्रहानं पृथ्वीच्या कक्षेत जाण्यासाठी ९८ मिनिटांचा वेळ घेतला होता."

Satelite sputnik
भारतातील कोरोना स्थिती चिंताजनक - WHO प्रमुख

नेटिझन्सनी महिंद्रांच्या प्रश्नाला केवळ उत्तरचं दिलेलं नाही तर यासंबंधीची काही अधिकची तथ्येही सांगितली. महिंद्रा यांनी जो दुसरा प्रश्न ट्विटमध्ये हिंटच्या स्वरुपात विचारला आहे. त्यानुसार, रशियानं सध्याच्या कोरोना विरोधातील लढ्यासाठी स्पुटनिक व्ही. नावाची अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षम अशी लस तयार केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com