
Anand Mahindra on 90-Hour Workweek Debate : काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याची सूचना केली. तुम्ही घरी बसून किती वेळ बायकोला बघणार, त्यापेक्षा रविवारीही कामावर या, असं ते म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा वर्कलाईफ बॅलेन्सची चर्चा सुरु झाली आहे. कामाच्या तासांबाबत सोशल मीडियावर अनेक जण त्यांचं मत व्यक्त करत आहेत. अशातच आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली.