आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मनुष्य बोलू शकत नव्हता, मात्र तरी तो मोबाईलवर व्हिडिओ चॅटवर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याही डोळ्यात नक्की पाणी येईल. तसेच, तंत्रज्ञानाचा किती चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे हे लक्षात येईल.

पुणे : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मनुष्य बोलू शकत नव्हता, मात्र तरी तो मोबाईलवर व्हिडिओ चॅटवर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याही डोळ्यात नक्की पाणी येईल. तसेच, तंत्रज्ञानाचा किती चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे हे लक्षात येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर ट्विट केले व्हिडीओ किंवा फोटो हे एका क्षणात व्हायरल होतात. यावेळी त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओही तसाच हृदयस्पर्शी आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की मोबाइल आपल्या जीवनात एक मोठा भाग झाला आहे.

Video : करिनाच्या पायाला बिलगली भिक मागणारी मुलगी अन्...

व्हिडिओमध्ये असे दिसते की, एक व्यक्ती मिठाईच्या दुकानाच्या बाजूला बसून मोबाइलवर व्हिडिओ चॅटद्वारे हातवारे करत बोलत आहे. ती व्यक्ती दिव्यांग असावी किंवा दिव्यांग व्यक्तीशी बोलत असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. व्हिडिओ शेअर करताना महिंद्रा यांनी, आपण बर्‍याचदा मोबाईलवर टीका करतो. आपण म्हणतो की मोबाइलने आपले आयुष्य बिघडवले आहे, ताब्यात घेतले आहे. परंतु, आपल्याला हे कळले पाहिजे की या उपकरणांनी आपल्यातील बर्‍याच जणांसाठी संवादाचे क्षण दिले आहेत'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahindra shares dumb man communication on mobile video on Twitter