चक्क हातगाड्यावर नेली Mahindra कार; आनंद महिंद्रांनी सांगितला किस्सा | Anand Mahindra Viral Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra Viral Tweet
चक्क हातगाड्यावर नेली Mahindra कार; आनंद महिंद्रांनी सांगितला किस्सा | Anand Mahindra Viral Tweet

चक्क हातगाड्यावर नेली Mahindra कार; आनंद महिंद्रांनी सांगितला किस्सा

Anand Mahindra Viral Tweet: 'महिंद्रा अँड महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा हे जगप्रसिद्ध उद्योगपती आहेत. पण सामान्य लोक महिंद्रा यांना त्यांच्या मजेदार ट्वीट आणि उदारतेसाठी ओळखते. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक ट्वीट इंटरनेटवर व्हायरल झाले. त्याने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती हातगाडीवर 'महिंद्रा कंपनी'च्या कारची बॉडी घेऊन जाताना दिसत आहे. आनंद यांच हे ट्वीट इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले.

हेही वाचा: महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात 57 टक्क्यांची वाढ

'महिंद्रा'ची गाडी हातगाडीवर नेली जात होती-

हा फोटो आनंद महिंद्रा यांनी ५ मे रोजी शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होतं की, हा फोटो माझ्या एका मित्राने मला फॉरवर्ड केला आहे. त्यांनी फोटोसोबत लिहीले की, महिंद्रा या ना त्या मार्गाने पुढे जात आहे! हे मला आवडले. हे खरं आहे. आम्ही पुढे जात राहू. इच्छा असेल तर मार्ग दिसतो. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या चित्रात एक माणूस हातगाडीवर 'जीप'ची बॉडी ठेवून रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. महिंद्रांच्या या ट्विटला आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो रिट्विट्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

Web Title: Anand Mahindra Viral Tweet Mahindra Car On Handcart

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cartweetAnand Mahindra
go to top