
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख आनंद शर्मा यांनी आपल्या पदाचा रविवारी (ता. १०) राजीनामा दिला. तरुण नेत्यांना संधी देण्यासाठी हे पद सोडत असल्याचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा यांनी पक्षाच्या या विभागाचे दहा वर्षे नेतृत्व केले. परराष्ट्र विभागाच्या राष्ट्रीय समितीची शेवटची रचना सन २०१८ मध्ये करण्यात आली होती.